‘परभणीच्या विकासाठी आम्ही काम करतो, श्रेयवादासाठी नाही’

औरंगाबाद : आम्ही परभणीच्या विकासासाठी काम करतो, श्रेयवादासाठी काम करत नसल्याचे मत परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघर्ष समितीचे तसेच माजी आमदार विजय गव्हाणे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना व्यक्त केले.

मला परभणीच्या जनतेने आमदार केले, त्याची परतफेड मला करायची होती, तर परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी आमची २०१८ पासुनची इच्छा होती. आणी येथील नागरिकांसाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणेसह राज्यातील कानाकोपऱ्यात शिकायला जातात. गरिब कुटुंब असल्याने ते खासगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेवू शकत नाहीत. परंतू आता या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यानंतर गरिबांना देखील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेता येवू शकेल. या मधून गरिब, गरजू विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेवून डॉक्टर होवून आपल्या माता – पित्याचे स्वप्न साकार करु शकतील.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये परभणी येथे कमी खर्चामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या बाबत काम सुरु होते. तर सहस्त्रबुद्धे समिती परभणीमध्ये आली होती. जागेची पाहणी देखील झाली होती. या बाबतचा रिपाेर्ट देखील फडणवीस सरकारला पाठवला होता. नंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले नाही, आणि हा विषय मागे पडू लागला. नंतर मी आणि खासदार फौजीया खान यांनी वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी खुप प्रयत्न केले. निर्दषणे, मोर्चो, आंदोलन केले. या दरम्यान माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यामध्ये खुप सहकार्य केले. आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला मुर्त रुप ( मंजुरी ) मिळाले. आम्ही सुरुवातीपासून सर्व पक्षीय एकत्र होताेत. तर आम्हाला या वैद्यकीय महाविद्यालय आल्याचे कोणतेही श्रेय घ्यायचे नसल्याचे देखील माजी आमदार विजय गव्हाणे यांनी बोलताना सांगितले.

अर्थसंकल्पात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर सर्व पक्षीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीकडून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा सत्कार देखील केला. आणी उत्साही कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त  करुन फटाके देखील फोडले.