यंदा आघाडीच्या जागा दुप्पट करू : बाळासाहेब थोरात

Enrichment of everyone's life due to education - Balasaheb Thorat

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या जागा दुप्पट निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे येथे बोलताना थोरात यांनी यंदाच्या निवडणुकीत २२० जागा जिंकू असे भाजप सांगत आहे. असा कोणताही आकडा आम्ही सांगणार नाही. मात्र २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने ८२ जागा जिंकल्या होत्या. त्या यंदा आम्ही दुप्पट करू, असा दावा केला आहे. तसेच पुढे बोलताना साम-दाम-दंड आणि भेदाचा वापर करुन भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेत आहे. कर्नाटक आणि गोवा विधानसभेत त्यांनी असेच केले. भाजपचे हे वर्तन लोकशाहीला अभिप्रेत नाही, अशी टीकाही थोरात यांनी केली.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीसोबत घेण्यासंदर्भात राज्यात अथवा केंद्रीय पातळीवर कोणताही निर्णय झाला नाही असंही स्पष्ट केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत मनसे कॉंग्रेससोबत येणार का हे येणार काळच ठरवेल.