माढ्यात विजय आमचाचं : मुख्यमंत्री फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघात आमचा विजय नक्की होणार आहे. तसेच आघाडीचे उमेदवार संजयमामा शिंदे हे एकटे पडले आहेत. तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या फोर्स मुळे भाजप माढा लोकसभा मतदार संघा मध्ये नक्कीचं आपला विजयाची नोंद करणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते न्यूज18 लोकमतच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माढ्याचे आघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे हे आता एकटे पडले आहेत कारण ज्यांनी संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले ते आता भाजप बरोबर आहेत त्यामुळे संजय शिंदे एकटे पडले आहेत. तसेच माढ्या मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सारखा फोर्स आमच्या पाठीशी आहे त्यामुळे माढ्यात भाजपचा नक्कीचं विजय होणार आहे.

Loading...

दरम्यान माढा लोकसभा मतदार संघामध्ये यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. कारण भाजप कडून रणजितसिंह निंबाळकर यांच्या सारखा धनाढ्य नेता उतरला आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी आघाडीने संजयमामा शिंदे यांना उतरवल आहे. पण दुसरीकडे माढा लोकसभेचा हुकमी एक्का म्हणून मानलं जाणारं मोहिते पाटील घराण हे भाजपच्या बाजूने असल्याने भाजप या मतदार संघात सहज विजय संपादन करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'