fbpx

कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या सर्व जागा निवडून आणू, चंद्रकांतदादांचा दृढनिश्चय

chandrakant_patil_

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या सर्व जागा निवडून आणू, असा विश्‍वास भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कोल्हापुरात आलेल्या पाटील यांचे दसरा चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्‍लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

इकडे चंद्रकांत पाटील हे दावा करत असताना तिकडे मुंबईत देखील काहीसं असंच चित्र पाहायला मिळाले. गेली विधानसभा निवडणूक भाजप — शिवसेने स्वतंत्र लढविली होती. मात्र, आता दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्वच्या सर्व ३६ जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.