स्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : गोरेगाव इथे भाजपच्या कार्यसमितीची बैठक सुरू आहे. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन दावा केला. आगामी निवडणूक स्वबळावर लढवली तर १७० जागा येतील अशी शक्यता आहे. लोकसभेत धुव्वा उडाल्यानंतर पुन्हा एकदा आघाडी जोमानं तयारी करून लढेल. मात्र यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी वेगवेगळं लढून दाखवावं दोघांच्या मिळून २० पेक्षाही जास्त जागा येणार नाहीत असं यावेळी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, याच मेळाव्यात रावसाहेब दानवे यांनी ‘भाजप हा एक परिवार आहे. मात्र काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना नवीन अध्यक्ष मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा तुकडे कापून-कापून बरमुडा झाला आहे अशा शब्दात कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.