पंतप्रधानांचे नेतृत्व मान्य असल्यास राणेंचे एनडीएमध्ये स्वागत – मुख्यमंत्री

मुंबई : नारायण राणे यांनी कालच नवीन पक्षाची स्थापना केली आहे. तर राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षासाठी एनडीएची दारे बुलेट ट्रेनच्या स्पीडने उघडण्यास सुरुवात झाली आहे. कारण काही तासांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नारायण राणे यांच्या पक्षाच धोरण एनडीएला पूरक असेल तर त्यांचं स्वागत करू असे सांगितले होते.

त्यानंतर आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणेंचे एनडीएमध्ये स्वागत केले जाईल अस सांगितलं.

नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य असल्यास आम्ही त्यांच स्वागत करू अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आता नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानाची एनडीएमध्ये सहभागी झाल्याच्या केवळ घोषणेची औपचारिकता राहिली असच म्हणाव लागेल.