fbpx

‘कितीही बोंबलू दे… आम्ही भाजपलाच मतदान करणार’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जनमानसात जाऊन आपले स्थान भक्कम करत आहे. या दृष्टीनेच राष्ट्रवादी पक्षाने निर्धार परिवर्तन यात्रा काढली आहे. या यात्रेतून सरकारवर टीकांचा भडीमार होत आहे. तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेलक्या शब्दात या यात्रेचंं माप काढल आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणूक निकालावरुन हे दिसून आले आहे की भाजप एकदाही पराभूत झालेला नाही. पण काँग्रेस-राष्ट्रवादी या निकालात औषधालाही शिल्लक राहत नाहीत, त्यामुळे अशा यात्रा काढून काँग्रेस-राष्ट्रवादी कितीही बोंबलू दे, पण आम्ही भाजपलाच मतदान करणार असे लोक सांगतात.

इस्लामपूरमधील कृषी विभागाकडून आयोजित दख्खन यात्रा महोत्सवाच्या कार्यक्रमात चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. दरम्यान पाटील म्हणाले की या पक्षांनी कितीही यात्रा काढल्या तरी जनतेला भाजप सरकारच फायद्याच ठरत आहे. त्यामुळे या यात्रा काढून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने कितीही बोंबा मारल्या तरी जनता भाजपलाच मतदान करणार असा ठाम विश्वास पाटलांनी प्रकट केला.