fbpx

राफेलचं सत्य समोर आणणार – शरद पवार

टीम मागराष्ट्र देशा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा बुलढाण्यात आयोजित केली होती त्यावेळी बोलताना पवार यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार आल्यास राफेल विमान खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणू असं आश्वासन आहे.

पुढे बोलताना त्यांनी “आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार म्हणजे देणारच शिवाय उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव देवू. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही. यापुर्वीही कर्जमाफी दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही म्हणजे नाही,” असं विधान त्यांनी केलं आहे.तसचं त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निष्ण साधला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘मी तुमच्यातील माणूस आहे हे लक्षात घ्या. दहा वर्ष त्या खासदाराला संधी दिलात मला फक्त ५ वर्षे संधी द्या असे आवाहन मतदारांना केले आहे.