तर आमचा नाईट लाईफला कडाडून विरोध…

Aditya thackeray vs ashish shelar

टीम महाराष्ट्र देशा – आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफची अंमलबजावणी निवासी  भागात न करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तरी निवासी भागात राहणाऱ्या नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा या नाईट लाईफला कडाडून विरोध असेल असंही शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

तसेच शेलार या नाईट लाईफ बाबतच्या नियम, नियमावली काय आहे असा सवाल केला. आणि ती  प्रसिद्ध व्हायची असून, ती झाल्यावर सविस्तर बोलूच असा म्हटलं आहे.

Loading...

आशिष शेलार ट्वीटच्या माध्यमातून काय म्हणाले

 

आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मुंबईत सुरवात होत आहे . यामुळे मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीच्या बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

या बैठकीत मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे अधिकारीही उपस्थित होते. तर हॉटेल आणि मॉल मालकांचे प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित होते. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला हिरवा कंदील मिळाला असून २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरु होईल अशी माहिती आहे .

याआधीच आदित्य ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. पण मागील सरकारात मुख्यमंत्री फडणवीस यांनी याला फारसं महत्त्व दिलं नाही. नाईट लाईफचं हे चित्र आता लवकरच मुंबईत दिसणार आहे.

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर हॉटेल व्यावसायिक यांनी नाईट लाईफमुळे रोजगार वाढेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. या बैठकीला मॉल्सचे प्रतिनिधी  तसेच पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाईट लाईफचा आढावा बैठक घेतली. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या निर्णयाचं अनेक संघटनांकडून स्वागत ही होत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण