‘घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणारचं’

टीम महाराष्ट्र देशा – गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव आहे. पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्याला भारतीय सैन्यही प्रत्युत्तर देत आहे. याविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत राहील असं विधान केले आहे.

पुढे बोलताना राजनाथ सिंग यांनी भारताने कधीही प्रथम गोळीबार केला नाही. असतानाही पाकिस्तान आगळीक करीत असून त्याला भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देत आहे असं विधान केले आहे. ते पूर्व लडाखमधील श्योक नदीवर बांधलेल्या कर्नल चेवांग रिनचेन पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली होती. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांची अनेक तळे उध्वस्त झाली आहेत. ही कारवाई तंगधार सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या तळांसह अनेक दहशतवादी ठार झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या डाव फसला . भारतीय सैन्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानला मोठा दणका बसला होता.

महत्वाच्या बातम्या