अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले

टीम महाराष्ट्र देशा : ‘शरद पवार आम्हा पैलवानाचे आधारस्तंभ आहेत. भारत सरकारने त्यांचे संरक्षण काढून घेतले ही घटना निंदनीय आहे. शरद पवार यांचे संरक्षण जरी केंद्र सरकारने काढून घेतले तरी आम्ही दिल्लीत जाऊन त्यांच्या बंगल्याबाहेर थांबू त्यांना संरक्षण देऊ. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी दिली.

ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना कदम म्हणाले की, ‘महाराष्ट्रात कुस्ती मल्लविद्या वाढावी म्हणून पैलवानाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या शरद पवार यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील,’ असा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला.

Loading...

पुढे बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘पवारसाहेबांना सरकारी संरक्षणाची गरज नाही. शरद पवार यांना आम्ही साक्षात बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. ते आमचे दैवत आहेत. आज त्यांना संरक्षण काढून त्यांचा जो अपमान केला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी तमाम पैलवान सरसावले आहेत. आम्ही दिल्लीत जाऊन त्यांना संरक्षण देऊ, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. 20 जानेवारी पासून सुरक्षा रक्षक काढले आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्याने दिलेली नाही.

तसेच राज्यात शरद पवार यांना Z security आहे. पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड होते. जे शिफ्ट मध्ये काम करत होते आणि एक PSO हा देखील होता. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारकडून सुरक्षेत कपात केल्याची माहिती आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण