मुंबई: मशिदींवरील भोंग्यांवरून चालू झालेल्या राजकारणाने आता वेगळं वळण घेतल आहे. भोंग्यांसंदर्भात जो काही निर्णय घेतला जाईल तो सर्वच धार्मिक स्थळांना लागू असेल असे राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांवरून जे आंदोलन राज ठाकरेंनी सुरु केलं त्याचा परिणाम मंदिरावरील भोंग्यांवर होणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधलाय.
मशिदींवरील भोंग्यांवरून सुरु असलेलं राजकरण पुढचे आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याचं किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्यांवरून स्पष्ट होत आहे. मात्र या धार्मिक राजकारणामुळे विकासाचे मुद्दे बाजूला रहात असल्याचं मत सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: