‘महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते.

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे गैरसमज झाला आहे असं त्यांनी म्हटले आहे.

ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही, अशा किल्ल्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांसादर्भात कोणत्याही गोष्टींची परवानगी शासनाने दिलेली नाही. ज्या किल्ल्यांना कोणताच इतिहास नाही. ज्यांच्या केवळ चार भिंतीच उरल्या आहेत. अशा किल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विचार करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा किल्ल्यांवरही लग्न किंवा इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही.

तसेच पुढे बोलताना माध्यमांतून प्रसारित झालेल्या बातम्या अतिशय चुकीच्या आहेत. याबद्दल स्वतः पर्यटनमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडावर ज्या प्रकारे विकासकामे केली आहेत. यापूर्वी कुठल्याही सरकारने अशाप्रकारे कामे केलेली नाहीत, त्याकडे कधीही लक्ष दिलेले नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.