शेतकऱ्यांच्या न्याय्य आणि हक्कांसाठी हे आंदोलन सुरु राहील; निर्यातबंदी उठवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

मुंबई : जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी करून केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष (आज) बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

याबाबत बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले कि “काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य आणि हक्कांसाठी शेतकऱ्याबरोबर हे आंदोलन सुरु राहील आणि ही निर्यातबंदी उठवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही”

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :

IMP