युती नाहीच, आम्हाला जी वागणूक दिलीय, ती कधीच विसरणार नाही- रामदास कदम

ramdas kadam

मुंबईः आमच्या टेकूवर सत्ता उपभोगत असतानाही तुम्ही आम्हाला जी वागणूक दिलीय, ती कधीच विसरणार नाही.उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाला युतीची आठवण होऊ लागलीय पण, आम्ही एकटे लढू आणि विधानसभेवर भगवा फडकवू अशी भाजपवर घणाघाती टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना – भाजप एकत्रच लढणार आहे. असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला होता. आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी १९९९ मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा रामदास कदम यांनी समाचार घेतला. तुमच्या डोक्यात जे शिजतंय, ते काढून टाका. युती करायची की नाही, याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत आणि त्यांनी आधीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय, असं कदम यांनी सुनावलं.

काय म्हणाले रामदास कदम ?
आमच्या टेकूवर सत्ता उपभोगत असतानाही तुम्ही आम्हाला जी वागणूक दिलीय, ती कधीच विसरणार नाही.उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाला युतीची आठवण होऊ लागलीय पण, आम्ही एकटे लढू आणि विधानसभेवर भगवा फडकवू.तुमच्या डोक्यात जे शिजतंय, ते काढून टाका. युती करायची की नाही, याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत आणि त्यांनी आधीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय.

संजय राऊत यांची टीका
शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक उद्धव ठाकरे आहेत. हे सुधीर मुनंगटीवार विसरलेले दिसतात. शिवसेनेने पुढील निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत ‘एकला चलो रे’ या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं आहे.शिवसेनेने काय करायचं हा निर्णय फक्त उद्धव ठाकरे घेतील, इतर कोणी त्यात लुडबूड करु नये.भाजपच्या लोकांना झोपेतसुद्धा ‘सामना’ दिसतो आणि ते दचकून उठतात, पराभवाची भीती भाजपच्या मानगुटीवर बसली आहे. गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...