fbpx

ही घटना आम्ही कधीही विसरणार नाही,या नृशंस हल्ल्याचा बदला घेतला जाईल : सीआरपीएफ

टीम महाराष्ट्र देशा – सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुलवामा इथं शहीद झालेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ही घटना आम्ही कधीही विसरणार नाही आणि यासाठी जबाबदार असलेल्यांना माफ करणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे.

‘पुलवामामध्ये हौतात्म्य आलेल्या आमच्या बहाद्दूर जवानांना आम्ही सॅल्यूट करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. ही घटना आम्ही कधीही विसरणार नाही आणि यासाठी जबाबदार असलेल्यांना माफ करणार नाही. या नृशंस हल्ल्याचा बदला घेतला जाईल,’ असं सीआरपीएफनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान,काल जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी अक्कल पाजळली असून ज्या पकड्यांनी ४० हून अधिक जवानांचा बळी घेतला त्या पाकिस्तानसोबत चर्चेतून कायमचा तोडगा काढला पाहिजे असा फुकटचा सल्ला दिला आहे.