धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणार- मनसे

blank

मुंबई : मनसे आणि शिवसेना यांच्यातील आणखी एक वाद समोर आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला रवाना ; एसटी बसद्वारे पालखीचे प्रस्थान

संदीप देशपांडे यांनी 26 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय कोरोना संकंट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली.

यासोबतचं महापालिकेतील वेगवेगळी कंत्राट कशापद्दतीने शिवसेनेच्या लोकांना दिली जात आहेत. यामध्ये वरुण सरदेसाई यांचा समावेश ही असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केला होता. हिच बाब अधोरेखित करत वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसचा फोटो ट्विट करत ‘असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच’, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी टीका केली आहे. ‘पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार?’, अशी टीका अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केली आहे .

स्व. बाळासाहेबांनी शाळेत असतानाच शिवसेना पक्ष काढला होता का ?, निलेश राणेंचा राऊतांना सवाल

‘महापालिकेचा ‘वरुण’ गोंधळ आतून तमाशा सुरु आहे. आम्ही मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश करणारच’, असा घणाघात अमेय खोपकर यांनी केला. याशिवाय ‘संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 24 तासात स्पष्टीकरण द्या, असं आव्हान देतो. स्पष्टीकरण द्यायची हिंमत आहे का?’, असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.