‘महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही’ ; डोंबिवलीतील कंपनीवर कारवाई

aditya thackrey

मुंबई : डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या ठिकाणी जल आणि वायू प्रदूषणाच्या तक्रारी नागरीकांकडून करण्यात येतात. आज पुन्हा त्याचाच प्रत्यय आला. डोंबिवलीतील गांधीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्यातून हिरव्या रंगाचं पाणी जोरोने वाहू लागले. या हिरव्या रंगाचा नाला पाहून नागरीकांनी त्याच्या विरोधात आवाज उठविला. काही नागरिकांनी या हिरव्या रंगाचा नाल्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे संबंधित व्हिडीओ प्रचंड व्हायरलही होत आहेत.

संबंधित नाल्याच्या व्हायरल व्हिडीओजची दखल कल्याण पूर्व ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी काल घेतली. त्यांनी ट्विटरवर याबबतचा व्हिडीओ शेअर करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली होती. त्यानंतर काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी देखील संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आल्याने केमिकेलचे पाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार थांबल्यानंतर नाल्यातील पाण्यात झालेल्या बदलाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘डोंबिवली गांधी नगर नाल्यात संभाव्य घातक सांडपाण्याची बातमी पाहताच एमपीसीबीने सदर कंपनीवर त्वरित कडक कार्यवाही केली आहे. महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही आणि प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली जातील’ असं आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP