आता भाजपमुक्त महाराष्ट्र करणार – अप्लेश ठाकोर

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातमध्ये माझ्या बरोबर हार्दिक पटेल आणि जिग्नेशने निर्माण केलेल्या प्रखर लढ्यामुळे भाजपची पीछेहाट झाली. सध्या देशात सुरु असणाऱ्या भाजपच्या एकदाधिकारशाहीमुळे संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरु केलेल्या लढ्याला साथ देवून भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी व्यक्त केला आहे. मुंब्रामध्ये आयोजित मुशायरा कार्यक्रमात ठाकोर बोलत होते.

देशातील दलित आणि अल्पसंख्याकांना दहशतीखाली जगाव लागल असून संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. देशातील कोटय़वधी जनतेला आपली अर्धी भूकही भागवता येत नाही. याकडे लक्ष द्यायला पंतप्रधानांना वेळ नसल्याचे भुकेच्या बाबतीत भारताने गाठलेल्या वरच्या क्रमांकावरून सिद्ध झाले असल्याचा आरोप यावेळी ठाकोर यांनी केला.