‘बिहार निवडणुकीमधील भाजपची विजयी परंपरा पुणे पदवीधर मतदारसंघात कायम राखू’

sujay vikhe

कागल : बिहार व इतर राज्यातील पोट निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे यशाची हीच परंपरा पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख यांना विजयी करून कायम राखूया असे आवाहन पुणे पदवीधर मतदार संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक खा. डॉ .सुजय विखे – पाटील यांनी केले येथे भाजपच्या पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणाचे संदर्भ बदलणार आहेत. त्याची सुरुवात कोल्हापूर मधून मताधिक्याने करावी. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन दोन काम करूया.

भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदार पदवीधर मतदार नोंदणी पासून भाजपने आघाडी घेतली आहे. पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे पर्यन्त कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविली आहे. हक्काचे असलेले मतदान करून घेऊन कोल्हापूर मधून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन संग्राम देशमुख यांच्या विजयात मोलाचा वाटा कोल्हापूरकरांचा राहील. असा विश्वासही व्यक्त केला.

पदवीधर मतदार संघात कमी होणारी मतदानाची टक्केवारी पाहता आपल्या हक्काचे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कागल तालुक्यामध्ये एक मत, एक कार्यकर्ता नियुक्त केला आहे. या मतदाराचे मतदान होईपर्यत जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. तसेच भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनाच एक क्रमांकाचे मत नोंदविण्यासाठी ते मतदारांना प्रवृत्त करतील. अशा पद्धतीचे सूक्ष्म नियोजन कागलमध्ये केले आहे. अशी माहिती घाटगे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या