fbpx

…तर आम्ही सरकारला मदत करू : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. तिथे पाणी देण्याची गरज असून याबाबत आम्ही सरकारला सहकार्य करु. असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. आवघ्या काही तासांवर लोकसभेचा निकाल येऊन ठेपला आहे. तसेच राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व पक्षाचे नेते दुष्काळी दौर्यावर आहेत. दरम्यान अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी, लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल संदर्भात त्यांना विचारले असता, निकालाआधीचं काय होईल हे सांगालया मी काही ज्योतिषी नाही. काय होईल ते निकाला नंतरच स्पष्ट होईल. निकाला आधीचं म्हणे कोणीतरी लाडू बनवायला घेतलेत. ज्यांना बनवायचे त्यांना बनवू देत. परंतू, निकालाआधीचं असं मी काही स्पष्ट करणार नाही. असे अजित पवार यांनी म्हंटले.

याचबरोबर, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर त्यांना विचारले असता, सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र याबाबत सरकारने अजून कोणतेही ठोस पावले उचलली नाहीयेत.परंतु ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. त्याठिकाणी पाणी देण्याची गरज असून याबाबत आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. असेही त्यांनी म्हंटले.