शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं : आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

येवला येथील सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारच तसेच आपला खरा देव हा लोकांच्या हृदयात, मनात असतो. जे शेतकरी बांधव मला आशीर्वाद देतात तो माझा खरा देव आहे. त्याच देवाला आज मी नमस्कार करायला निघालो आहे, हीच माझी खरी जनआशीर्वाद यात्रा आहे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, या सभेआधी आदित्य ठाकरेंची धान्य तुला करण्यात आली. या तुलेसाठी वापरण्यात आलेलं ६२ किलो धान्य, गोरगरिबांना वाटण्यात येणार आहे.