fbpx

‘राजकीय मैदानावर आम्हाला पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल’

टीम महाराष्ट्र देशा : क्रिकेटच्या पिचवर विकेट घेण्यासाठी कधी कसा बॉल टाकायचा हे आम्हाला माहिती आहे. राजकीय मैदानावर देखील यावेळी आम्हाला पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल हे निश्चित आहे .परळीची जनता, नेहमीच माझ्या पाठीशी असल्यामुळे कोणतेही मैदान मीच जिंकणार’, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी क्रिकेटच्या मैदानावर राजकीय फटकेबाजी केली. नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

कुणाची विकेट घेण्यासाठी कोणता बॉल टाकायचा हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. यावेळी विरोधकांचे नाव न घेता पहिल्याच बॉलवर विकेट काढण्याचा आपला निर्धार आहे असा चिमटा मुंडे यांनी यावेळी काढला.

1 Comment

Click here to post a comment