डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले

ramdas aathwale

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे लोकशाहीचा प्राण आहे. भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे देशभर घराघरात संविधानाचा प्रचार करणार असे सांगत संविधानिक मूल्यांच्या आधारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांतील एकसंघ रिपाइं आपण साकार करुया असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रिपाइं च्या वतीने आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी सभेचे आयोजक रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; रिपाइं चे सौ सीमाताई आठवले माजी राज्य मंत्री अविनाश महातेकर सुमंतराव गायकवाड राजा सरवदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आम्ही संपूर्ण देशात पोहोचविला असून ईशान्य भारतातील दुर्गम राज्यांत ही रिपाइं पोहोचला आहे. असे आठवले म्हणाले.

महाराष्ट्रात भाजप शिवसेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे त्यात तीन वर्षे भाजप आणि दोन वर्षे शिवसेनेला असे मुख्यमंत्री पदाचे वाटप करावे असे मी सुचविले होते मात्र दोघांनी माझे न ऐकल्यामुळे सत्ता हातातून गेली आहे असे सांगत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले .

भीमकोरेगाव प्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा झोपडीवासी ग्रामीण भागातील गरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या