नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. रविवारी त्यांनी भाजपचे मंत्री गिरिश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांच्या विवाहसोहळ्यास हजेरी लावली होती. यावेळी त्यांना पत्रकरांनी संजय राऊतांच्या नागपूर दौऱ्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी हसत-हसत ‘नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते’, असे म्हटले होते. या सल्यालाच आता स्वतः शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत काल (२१ मार्च ) नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना अमृता फडणवीस यांच्या सल्ल्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनीही हसत हसतच, ‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू’, असे म्हटले.
दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून (२२ मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा या अभियानासाठी सोमवारी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “ममता बॅनर्जींच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांना केंद्राने चणे-कुरमुरे वाटावेत अशी सुरक्षा…”, राऊतांचे टीकास्त्र
- धनंजय मुंडे पाच-सहा मुलांचे वडील; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप
- “सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ…”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- ‘आता तो पहिल्या सारखा फिनिशर राहिला नाही’ ; भारताच्या माजी खेळाडूचे धोनीबाबत मोठे वक्तव्य
- “प्रतिज्ञापत्रात दोन लग्न झाल्याचा खुलासा करा…”- चंद्रकांत पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला