तुळजापूर विधानसभेच्या विकासासाठी कटीबद्ध – रोहन देशमुख

तुळजापूर : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. तसेच अनेक नेते आपआपल्या मतदारसंघात सक्रीय झालेले दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर युवा नेते रोहन देशमुख यांनी मोठ विधान केले आहे.

तुळजापूर तालुक्यातील काही गावातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन रोहन देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना देशमुख यांनी ‘तुळजापूर क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देऊन काम करु, ग्रामस्थांच्या समस्या सोडवून विकास साधण्यासाठी सदैव कटीबद्ध असेन, सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर, सांगली अशा पुरस्थितीतील ठिकाणी नागरिकांना सगळे जण जमेल तसे मदत देण्याचे आवाहन रोहन देशमुख यांनी यावेळी केले.

तसेच देशमुख यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थितांमधून लाईट कनेक्शन, काही ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती, अशा सामाजिक अडचणी संदर्भात मागणी केली. यावर सकारात्मकता दर्शवत समस्या निवारण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले.

भाजप सरकारच्या प्रत्येक क्षेत्रातील दमदार कामगिरी, विकासात्मक प्रगती व धाडसी निर्णयामुळे सध्या जनतेचा विश्वास बळावत आहे, प्रगतीची दिशा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असल्याने तुळजापूर तालुक्यातील बीजनवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भैरू लांडगे यांचा रोहन देशमुख यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला.

दरम्यान, भाजप युवा नेते रोहन देशमुख यांच्या उपस्थितीत तुळजापूर तालुक्यातील नांदुरी, आरळी (बु), आरळी (खु), बिजनवाडी, तीर्थ (बु), तीर्थ (खु), रायखेल, मंगरुळ, कुंभारी येथील २५/१५ अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी भाजप तुळजापूर तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, विजय शिंगाडे, दत्ता राजमाने, शिवाजी सरडे, गजानन वडणे, बालाजी शिंदे, पंकज पाटील, बाबा बेटकर, मकरंद लबडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नागेश चौगुले, अनिल जाधव, दयानंद पाटील तसेच गावचे सरपंच, उपसरपंच व गावकरी उपस्थित होते.