पाच राज्य जिंकल्यानंतर अनेकांना पंख फुटलेत, जग जिंकल्यासारखं वाटतंय – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर अनेकांना पंख फुटलेत, जग जिंकल्यासारखं वाटतंय. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. औरंगाबादच्या रुख्मिणी सभागृहात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

देशात दलाल कोण असतील तर ते काँग्रेस आहे, त्यामुळे हे निवडून आले तर देशाची दलाली करतील, असा आरोप फडणवीस यांनी केला. येणाऱ्या निवडणुकीत संघटनेच्या कामावर निवडणून यावं लागेल. भारतात युवा मतदार महत्वाचा आहे. जो पक्ष या युवकांपर्यंत पोहोचेल त्यांना आपले ध्येय धोरण सांगू शकेल तोच यशस्वी ठरू शकतो. मोदींनी केलेल्या कामांमुळे आपण ताठ मानेने जाऊ शकतो, असं त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

Loading...

तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. हिंदी हार्टलँड असणाऱ्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली. तर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तब्बल 15 वर्षांनी सत्ता मिळवली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने