मुंबई : सांगली -मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौरपदाचा धक्कादायक निकाल लागला असून सांगली मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत.भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी निवडून आले.
सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते. राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
भाजपाला पराभूत केल्यानंतर काँग्रेसने हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. आता, काँग्रेस नेत्या व राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! हे यश महाविकास आघाडीच्या एकजुटीचं प्रतिक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला धोबीपछाड देऊ, अशी खात्री आहे.’ असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! हे यश महाविकास आघाडीच्या एकजुटीचं प्रतिक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला धोबीपछाड देऊ, अशी खात्री आहे.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) February 23, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- नारायणगडासाठी पंकजा मुंडेंनी घोषणा केली, निधी मात्र दिला नाही-धनंजय मुंडे
- नियम सर्वांना सारखेच, राठोड समर्थकांवर तात्काळ कारवाई करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश !
- …तर आज तुमच्या मागणीला नैतिक अधिकार असता ; सावंतांचा मुनगंटीवारांना टोला !
- पिंक बॉल टेस्ट साठी टीम इंडिया सज्ज, ‘हे’ अकरा शिलेदार करणार इंग्रजांची बत्ती गुल !
- ‘फोटो, ऑडिओ क्लिप्स समोर येऊन देखील ठाकरे, पवार गप्प का ?’