काळ्या कायद्याविरोधात शेतकरी, कामगारांच्या हितासाठी संघर्ष करत राहू- बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- काँग्रसने शेतकरी, कामगार यांच्यासाठी हक्काचे कायदे केले होते. परंतु आता ते कायदे रद्द करून शेतकरी व कामगार यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचे काम सुरु झाले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या काळ्या कायद्याचे दुरगामी परिणाम होणार आहेत. हे कायदे कामगार, शेतकऱ्याच्या हितासाठी नाहीत.

या कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा पेटून उठला आहे. या कायद्यामुळे काँग्रेसने उभी केलेली बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी, काळा बाजार करणाऱ्यांना मोकळे रान मिळणार आहे. काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कामगारांसाठी लढत आहे. आपणही पेटून उठले पाहिजे अन्यथा पुढचे दिवस चांगले नाहीत. शेतकरी, कामगारांच्या हितासाठी हा एल्गार सुरु केला असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने काल महाव्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमात ना.थोरात बोलत होते. यावेळी ना.थोरात पुढे म्हणाले की, शेतकरी बचाव महाव्हर्च्युअलसाठी राज्यातील १० हजार गावांमध्ये एलसीडी, एलईडी, टीव्ही स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती.

या रॅलीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सोशल मीडियाच्या फेसबुक, यूट्यूब, ट्वीटर यावरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. शेतकरी बचाव महाव्हर्च्युअल रॅलीत राज्यभरातून ५० लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातून एकाच सहा ठिकाणांहून काँग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या रॅलीला औरंगाबाद येथून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, काँग्रेस कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कोल्हापूर येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील, अमरावती येथून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर येथून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी संबोधित केले, कोकण विभागात काँग्रेस कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी रॅलीला संबोधीत केले.

महत्वाच्या बातम्या:-