fbpx

‘लिहून ठेवा, राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच पुण्यातील महर्षीनगर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ विधान केले आहे.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार हे लिहून ठेवा तसेच सरकार येणार म्हणून संघटन बांधणीकडे दुर्लक्ष करु नका अन्यथा भाजपचा काँग्रेस होईल असंही पाटील यावेळी म्हणाले. पुढे बोलताना राज्यात भाजपचे संख्याबळ १०० च्या खाली येता कामा नये. यासाठी २ महिने जिद्दीने काम करा, नुसते अहवाल खरडू नका अशा सूचनाही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर येत्या निवडणुकीत भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांचा वाटा महत्वपूर्ण ठरणार आहे.