आम्ही सत्ताधारी होणारच ! तुम्हाला काय करायचं ते करा – प्रकाश आंबेडकर

Prakash-Ambedkar

पुणे : सत्ता काबीज करायची असेल तर मत ट्रान्स्फरेबल असलं पाहिजे. एकत्र येण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. आमचं बहुजनपण मतातून दिसलं पाहिजे. तसेच प्रलोभनांना बळी न पडता आम्ही सत्ता ताब्यात घेऊ. चार महिने तुम्हाला काय खेळ करायचा ते करा, आम्ही सत्ताधारी होणारच ! असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भटक्या विमुक्त जातींच्या सत्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

Loading...

शात अस्वस्थता निर्माण करुन दंगली घडवण्याचा सरकारचा अजेंडा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. आरक्षण संपवण्यासाठी यज्ञ सुरू आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही ?, असा सवालही आंबेडकरांनी केला आहे.

गेल्या वर्षी 20 डिसेंबरला कोरेगाव मधील मशीद जाळली, त्याचा अद्याप तपास नाही. या सरकारचा अजेंडा दंगली घडवणे हा आहे, मध्यप्रदेशात आरक्षण संपवण्यासाठी बजरंग दल, आरएसएसवाले 51 ठिकाणी यज्ञ करण्यात येत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असा थेट आरोप प्रकाश आंबेडकरांनी भाजप सरकारवर केला आहे.Loading…


Loading…

Loading...