आम्हीच मोठे भाऊ, दिल्लीच तख्त गदागदा हलवणार – संजय राऊत

sanjay raut1

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत चांगलेच आक्रमक होत युतीसंदर्भात स्शिव्सेनेची भूमिका मांडली आहे. यावेळी ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार’ अशा शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, युती संदर्भात भाजपने प्रस्ताव मांडल्याच्या केवळ अफवा आहेत, असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तसेच हा मोठा भाऊच दिल्लीचे तख्त गदागदा हलवणार आहे, असही ते यावेळी म्हणाले. आज झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. लवकरच सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर, राफेलच्या प्रश्नावर आणि दुष्काळाच्या प्रश्नांवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आम्ही लढण्यासाठी तयार आहोत, असेही शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.