तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज देखील काढू – चंद्रकांत पाटील

blank

पुणे: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक भागात पुराचा फटका बसला आहे. प्रत्येक पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, वेळ पडल्यास राज्य सरकार कर्ज देखील काढेल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. पुण्यामध्ये आयोजित शासकीय बैठकीनंतर पाटील बोलत होते.

पूरग्रस्तांसाठी राज्यभरात ५०० च्या वर निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. जवळपास ३ लाखापेक्षा जास्त लोकांना निवारा केंद्रात आसरा देण्यात आला आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीची परिस्थिती पाहता पुराचा फटका बसलेल्या गावांचे पुनर्वसन सहा ते आठ महिने चालणार चालेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

दरम्यान, पुरामुळे राज्यातील नागरिकांचे हाल होत असताना भाजपकडून पुन्हा एकदा महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे, यासंदर्भात पाटील यांना विचारलं असता त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.

महत्वाच्या बातम्या