वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था

तो आमचा कार्यकर्ता नसला तरी तो एक चांगला व्यक्ती आहे - अॅड. संजीव पुनाळेकर

टीम महाराष्ट्र देशा : स्फोटकं आणि देशी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एटीएसच्या पथकानं नालासोपाऱ्यातून अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक नसल्याचं सनातन संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘तो आमचा कार्यकर्ता नसला तरी तो एक चांगला व्यक्ती आहे. आम्ही त्याला शक्य ती मदत करू,’ असं सनातनचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी म्हटलं आहे.

नालासोपारा देशी बॉम्ब प्रकरणी वैभव राऊतला अटक झाल्याने संशयाची सुई पुन्हा एकदा सतानन या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेकडे वळलीय. अटक करण्यात आलेला आरोपी वैभव राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय. त्याच्याकडून पोलिसांनी 8 देशी बॉम्बसह इतरही घातक सामुग्री हस्तगत केली आहे. पण सनातन संघटनेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मात्र, त्याच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. हा पोलीसांचाच कट असल्याचा आरोप त्यांनी केला.

bagdure

तर वैभव राऊत सनातन संस्थेचा साधक असल्याचा बातम्यांमध्ये उल्लेख आहेत. वैभव राऊत धडाडीचा गोरक्षक असून तो ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.

रामानेही सीतेला दिला होता तिहेरी तलाक; कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे

You might also like
Comments
Loading...