विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो पण त्यांनी भेटीसाठी वेळ ही दिली नाही – भाजप

uddhav thackerya

मुंबई– दुर्दैवाने एका पक्षाची युवा संघटनेने सत्ताबाह्य केंद्र सुरु केले आहे. अंतिम वर्षे परिक्षा रद्द झाल्याचे त्यांनी जाहीर केले तसेच परस्पर शाळा सुरु व्हायच्या तारखा ही त्यांनीच जाहीर केल्या. हे सत्ता बाहेरील केंद्र एका पक्षाची युवा संघटना निर्माण करते आहे ते राज्यासाठी घातक आहे. केवळ आपले नेतृत्व युवकांमध्ये निर्माण होण्यासाठी हे सत्ताबाह्य केंद्र सुरु केले जात असल्याची टीका भाजपनेते आ. आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार अँड निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिका गट नेते संजय वाघुलै आदी उपस्थित होते. यावेळी शेलार यांनी चौफेर टोलेबाजी केली.

शेलार म्हणाले,एका राजकीय पक्षाची युवा संघटना सरकारला बेकायदेशीर निर्णय घेण्यास भाग पाडते आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन 12 प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे द्या, मग निर्णयावर बोलू. पण सरकारने त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीच शिवाय मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ ही दिली नाही. म्हणून आम्ही राज्यपालांना भेटलो. एटीकेटी असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थीना नापास करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एका पिढीचे नुकसान केले जाते आहे.

हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे; जितेंद्र आव्हाड माध्यमांवर भडकले

भाजपमध्ये गेल्याचा किंचितही पश्चात्ताप नाही- विखे पाटील

सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे – अमित शहा