fbpx

आपण खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो : कपिल सिब्बल

kapil sibble

दिल्ली – आपण खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो. मला या पत्रकार परिषदेत बोलवण्यात आले त्यामुळे मी गेलो होतो असे उत्तर कपिल सिब्बल यांनी दिले आहे. सय्यद शुजा याच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल होते, याचा अर्थ ही पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजित होती असा आरोप भाजपाने केला आहे. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

काल लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत इव्हीएम हॅकिंग संदर्भातला खुलासा झाला होता . त्या संदर्भात कपिल सिब्बल म्हणले की, कार्यक्रमाचे आयोजक आशिष रे यांना मी ओळखतो. त्यांनी मला इमेल करून या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. या प्रकरणाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. हे प्रकरण निवडणुकांशी संबंधित आहे, असे स्पष्टीकरण सिब्बल यांनी दिले आहे.

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची माहिती होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने केला होता. त्याने पत्रकार परिषद घेऊन २०१४मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना होती असा धक्कादायक खुलासा त्याने केला होता. त्यानंतर ही पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजित होती असा आरोप भाजपाने केला आहे. त्यावर सिब्बल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

1 Comment

Click here to post a comment