fbpx

‘आम्हाला एअर स्ट्राइकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत’

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय वायूसेनेने २६ फेब्रुवारीला बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नष्ट केले होते. अखंड विश्वात भारतीय वायुसेनेच्या पराक्रमाचा डंका वाजत असताना विरोधी पक्षांनी मात्र आता यावरून राजकारण सुरु केले आहे.

नेहमी वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेण्यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी बालाकोट एअर स्ट्राइकबाबत प्रश्न उपस्थित करत, सरकारने याबाबत पुरावे प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दहशतवादावर राजकारण करु नये असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला. गुप्तचर यंत्रणेला इतके मोठे अपयश आले आहे. याचा जबाबदार कोण आहे. याला जबाबदार असणाऱ्यावर तुम्ही काय कारवाई केली आहे अशी विचारणा देखील त्यांनी केली.

पुढे बोलताना या कारवाईचे तुम्ही राजकारण करत आहात असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला . आम्हाला एअर स्ट्राइकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत. यामुळे देशातील जनतेला आणि शहिदांच्या कुटुंबीयांनाही समाधान लाभेल, असे ते म्हणाले.