मुंबई : महाविकास आघाडीत अंतर्गत वाद होत आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या वादात भर पडली आहे. कीर्तीकरांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतीले चाललेले वाद दिसत आहेत. शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीत एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नाही. शिवसेनेवर अन्याय होतोय असे त्यांनी बोलून दाखवले.
“आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राह्मणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन करण्यात आलं. या समारंभात किर्तीकर बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –