पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यापासून पासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही.

पण इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होते, हे आमचं मत आहे. त्यांनी ते मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला असल्याचे पवार म्हणाले.यानंतर अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये, अशी सूचना करणार नसल्याचे सांगत सगळे शहाणे असल्याचेही पवार म्हणाले. तसेच हे सरकार आपल्याला पाच वर्ष चालवायचं आहे, काँग्रेस याबाबतीत व्यवहारी आहे, असा सूचक इशाराही त्यांनी राऊतांसोबत कॉंग्रेसला दिला आहे.

Loading...

सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. ते सर्वच काही माहिती नसतात. महमद अली रोडवरील माझ्या एका सभेत हाजी मस्तान होता. असं वादळ उठलं होतं. मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. असेही पवारांनी पुढे म्हटलं.

संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलतांना इंदिरा गांधी या हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्या संपर्कात होत्या असा खळबळजनक दावा केला होता.त्यातून ते चांगलेच अडचणीत आले होते.अखेर वक्तव्य मागे घेत त्यांनी वादावर पडदा टाकायचं प्रयत्न केला होता.यावर पवारांनी सूचक इशारा दिला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार