आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी ठाम : शिवप्रतिष्ठान

टीम महाराष्ट्र देशा : प्रवचनकार ,किर्तनकार निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने उडी घेतली आहे. आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

यावेळी चौगुले यांनी म्हटले की, काहीजण इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. पण सरकारने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व ताकदीने रस्त्यावर उतरेल.

Loading...

कीर्तनकार निवृत्ती देशमुख यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आज नगरमध्ये आल्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

राज ठाकरेंच्या पत्रकारांशी औपचारिक गप्पा | Raj Thackeray’s Informal Conference at Aurangabaad | Maharashtra Desha |
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं