रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे

blank

टीम महाराष्ट्र देशा: मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी एक ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, २३ जानेवारी १९८९ रोजी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत आमच्या घरी नियमित ‘सामना’ येत होता. आम्ही पत्रकारांनी केलेली टीका समजू शकतो, पण रडत राऊतजी आता आगपाखड करत आहेत. त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद.

अशा आशयाच ट्वीट करत सामना वृत्तपत्रावर बहिष्कार टाकला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या स्थापनेनंतर २३ जानेवारीला पहिलंच अधिवेशन घेत पक्षाचा झेंडा बदलला. तसेच पुढील काळात मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.राज ठाकरेंनी तशी काही चिन्ह दाखवले.यानंतर शिवसेनेकडून मनसेवर जोरदार टीका होत आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून मनसे देखील आक्रमक झालेली दिसत आहे . मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट ‘सामना बंद’ची मोहीम सुरु केली आहे.
वी

र सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्याचां खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्याचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्त्वाचाच आहे”, अशा शब्दात शिवसेनेने मनसेवर टीका केली.

यापुढे मनसे – शिवसेना वाद अजून तीव्र झाला तर काही गैर नाही असेच यावरून दिसते.