दहशतवादी कृत्यामध्ये पैशांसाठी नाही तर जिहादसाठी सहभागी झालो; संशयित दहशतवाद्यांची कबुली 

jihad

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २ पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दरम्यान पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले १६ जण पश्चिम बंगालमध्ये लपले असल्याची शक्यता आहे. असा दावा पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या  संशयित दहशतवाद्यांना काल मध्यरात्रीनंतर दिल्लीमधील एका न्यायाधिशांच्या घरीच त्यांच्यासमोर हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार बंगाली भाषा बोलणारे १६ आणि पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले काही तरुण पश्चिम बंगालमध्ये लपले आहेत. तसेच आपण या दहशतवादी कृत्यामध्ये पैशांसाठी नाही तर जिहादसाठी सहभागी झालो आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगला गेल्याची माहिती या दोघांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या