‘हिंदूंविरोधी असलेला सामना वाचणे आम्ही केंव्हाच बंद केले’

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी वाढत्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने याच मुद्द्यावरून आज सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका केली आहे. ‘पेट्रोलचे भाव वाचून ज्याच्या छातीत कळ येणार नाही तो शूरवीर व ज्यास घाम फुटेल तो कमकुवत मनाचा, असा जो प्रकार सध्या आपल्या देशात सुरू आहे तो खतरनाक मनोवृत्तीचा आहे.

लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल, तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा.

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत’, असं म्हणत शिवसेनेने अग्रलेखातून मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, यावर भाजप नेते नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. ‘हिंदूंविरोधी असलेला सामना वाचणे आम्ही केव्हाच बंद केले. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचला. आता वेगळ्या प्रकारचा सामना वाचायला भेटतोय’, असं राणे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या