प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणीत राहणारी ‘ती’ शाळा

z p p school kondhej karmala

आज एक मित्र त्याची मुंबईमधली शाळा आता कशी आहे हे सांगत होता. त्याने शाळेमध्ये असताना केलेल्या करामतींचे किस्से सांगून झाल्यावर त्याने सहज विचारलं सर तुम्ही कुठे होता शाळेला ? तुम्हीही खूप धमाल केली असेल ना…? त्याने तो प्रश्न सहज विचारला आणि मी माझ्याच विचारात हरवून गेलो. त्यानंतर तो बोलत राहिला मात्र माझ्या डोक्यात शाळेच्या मखमली आठवणी गर्दी करू लागल्या.

प्रत्येकाच्या डोक्यात काही नापास होऊन आलेले, निम्म्यातूनच शाळा सोडून गेलेले मित्र, गुरुजी, शाळेची इमारत, मैदान, झेंड्याचा कट्टा! शाळेत वर्ग सजवताना पताक्यांसोबत घातलेला धिंगाणा! सर्वांच्यासोबत खाल्लेला मार! शाळेची सहल! टिंगल टवाळी, अखंड बडबड, असा फार मोठा आणि वैविध्यपूर्ण पसारा चुंबकाला चिकटलेल्या विविध लोखंडांच्या वस्तूंप्रमाणे झालेला असतो .तसा माझ्याही आहे

Loading...

आमच्या शाळेची स्थापना १८६६ साली झाली होती जी.प.कोंढेज.ता.करमाळा,जी. सोलापूर ही माझी शाळा पूर्वी सरस्वती विदयामंदीर या नावाने ओळखली जात होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती,पोलीस, अधिकारी, शिक्षक,तसेच नेते त्याचबरोबर सुजाण नागरिकांच्या रूपाने अनेक फळं या ज्ञानवृक्षाला आली .

मला नेहमी माझी शाळा माझ्या कुटुंबाप्रमाणे वाटायची कारण पहिली ते चौथीपर्यंत ज्यांनी आम्हाला शिकवलं त्या चंद्रभागा बाई आमच्या शेजारीच राहायच्या त्यामुळे शाळेत जरी गेलो तरी कोणीतरी घरातील व्यक्ती कायम आपल्या सोबत आहे असं वाटायचं.खरं म्हणजे शिक्षक हे एका माणसाचं सैन्य असतं. शिक्षक वर्षभर वर्गात अज्ञानाशी लढत असतो. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते.

प्रा. हेमंत गोखले यांनी “वाचिले ते वेचिले’ या शीर्षकाचे ललित गद्य लिहिलेले आहे. त्यातील एका लेखात ते लिहितात- “”शाळेत जे शिकवले जाते ते विसल्यानंतर विद्यार्थ्यांजवळ जे उरते ते शिक्षण!” हे अगदी खरं आहे.

आम्ही शाळेत असताना बसण्यासाठी बेंच नव्हते तेव्हा शेणाने सारवून घेतलेल्या जागेवर बसायला कधीच कमीपणा वाटतं नव्हता. माझ्या घरापासून माझी शाळा अगदी हाकेच्या अंतरावर होती मात्र पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्याने जे आमचे मित्र परगावावरून यायचे ते घरी कसे पोहचणार? याची प्रचंड काळजी वाटायची. एका पावसाळ्यात शाळेवरचे पत्रे उडून गेले तेव्हा स्वतःच्या घरावरचे पत्र उडून गेल्यावर जे दुःख झालं ते दुःख आम्हां सर्वांना झालं.

पुढे कॉलेजला गेल्यानंतर वेगवेगळ्या खेळात कॉलेजसाठी जिल्हा तसेच राज्य स्थरावर खेळलो मात्र लहानपणी गावातील शाळेत असणाऱ्या वाकड्या कडुलिंबाच्या झाडावर सूरपारंबीचा खेळ खेळण्यात जी मजा होती ती पुन्हा कुठेच मिळाली नाही. अगदी पहिलीपासून शाळेत असताना 26 जानेवारी ,15 ऑगष्ट या दोन राष्ट्रीय सणांच्यानिमित्ताने झालेल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही सहभागी करून घेतलं जायचं अर्थात तस वातावरण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल कायम आम्ही शाळेचे ऋणी राहू . पुर्वी शाळेत सकस आहार (होता की नाही माहीत नाही)म्हणून सुकडी दिली जायची… ती घेण्यासाठी सुद्धा भांडण व्हायची .सुकडी घरी नेल्यावर शिरा बनवल्याप्रमाणे जे काही आई बनवून द्यायची त्याची टेस्ट कमाल होती.

हल्ली पुण्यात मित्रांसोबत एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर नाश्ता जर चांगला नसेल तर का माहीत नाही पण यापेक्षा सुकडी बरी होती असंच वाटतं. आज शाळेने कात टाकली आहे. मराठी सोबत इंग्रजीचं देखील दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. जुन्या लाकडी फळ्याची जागा आता संगणकांनी घेतली आहे. अनेक प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याचं काम शाळा करत आहे. अभिमान वाटतो.

– दीपक पाठक

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू