‘देशात लोकशाही व्यवस्था आणि मूल्ये टिकवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची गरज’

sharad pawar

मुंबई: आज १५ सप्टेंबररोजी ‘जागतिक लोकशाही दिन’ आहे. यानिमित्तानेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की,’मानवी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लोकशाहीमुळे बळ मिळते. मात्र आज देशात लोकशाही व्यवस्था आणि मूल्ये टिकवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची आज गरज निर्माण झाली असून यासाठी सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी ट्वीट करत केले आहे.

आज जागतिक लोकशाही दिनानिमित्त अनेक दुग्गाज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर जगातील सर्वांत मोठी आणि भक्कम लोकशाही म्हणून आपल्या देशाची ख्याती आहे. परंतु गेल्या काही काळात लोकाशाही मूल्ये डळमळीत करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. असा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

दरम्यान देशात पेगाससप्रकरण आणि त्यावरून संसदेत झालेला गोंधळ यामुळे लोकशाही धोक्यात असल्याचे केंद्रातील विरोधी पक्षाने सतत म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने तर मोदी सरकारमुळे लोकशाहीची मूल्ये संपुष्टात येत असल्याचेही म्हटले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षाने एकजूट करत एकत्र येण्याची गरज असल्याचे कॉंग्रेसने नेहमी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या