नागपूर: विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून (२२ मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) हे सुद्धा या अभियानासाठी सोमवारी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले.
“नागपूरच्या नेत्यांना मुंबई जास्त आवडते व आम्हाला नागपूर प्रिय आहे”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मोदी साहेब खूप काम करत आहे. ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. मात्र आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असे बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवल आहे. असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजप प्रेदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
दरम्यान शिवसेनेने नागपूरसह संपूर्ण विदर्भावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्क मोहिमेच्या माध्यमातून पक्ष संघटनेला सशक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : “मला पाहायचं होतं की…”, स्वत: राहुलनंच सांगितलं पंजाब किंग्जपासून वेगळं होण्याचं कारण!
- “मी त्याच्याकडे गेलो आणि…” हरभजन सिंगने उजागर केली वॉर्नसोबतची ‘फॅनबॉय मुमेंट’
- २०२२ ‘लॉकडाऊन’मध्ये जाणार? अमेरिकेने दिला धक्कादायक इशारा!
- मविआ सरकारने छत्रपतींचीही फसवणूक केली- चंद्रकांत पाटील
- IPL 2022 : ‘किंग कोहली’ स्पर्धेआधी आरसीबीच्या संघात सामील; चाहते सुखावले!