तरीही २०१९ च्या निवडणुका स्वबळावरच – संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. पण शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, 2019 च्या निवडणुका स्वबळावरच लढविण्याच्या अजेंडावर शिवसेना ठाम असल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा बोलून दाखवलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘बुधवारी अमित शहा व उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये दोन तास अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबद्दलची माहिती समोर आली नाही. पण भाजपाकडून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

You might also like
Comments
Loading...