आम्ही फक्त ठोकतो , मृतदेहांची मोजदाद करणे हे आमचं काम नाही : बी. एस. धानोआ

टीम महाराष्ट्र देशा : बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक नंतर आज वायुसेनेच्या प्रमुखांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. यामध्ये वायुदल प्रमुख बी. एस. धानोआ यांच्याकडून भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक संदर्भात सवीस्तर खुलासा करण्यात आला.

यावेळी धनोआ यांनी शंका व्यक्त करणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम दिला. एअर स्ट्राईक बाबत अनेक विरोधी पक्षांकडून शंका व्यक्त केली जात होती. पण या शंकेच निरसन करण्यासाठी धनोआ म्हणाले की, एखाद्या ठिकाणाला निशाणा करुन तेथे हल्ला करण्याचं ठरवण्यात आल्यानंतरच आम्ही त्यावर निशाणा साधतो. आणि इथे आम्ही तो साधला. नाहीतर पाकिस्तानने या प्रकरणी वक्तव्य का केलं असतं? असा प्रश्न धानोआ यांनी उपस्थित केला. तर या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबत बोलताना धनोआ यांनी याविषयीची माहिती सरकारकडून देण्यात येईल व मृतदेहांची मोजदाद करणे हे आमचं काम नाही असे खवचट शब्दात उत्तर दिले.

दरम्यान पत्रकारांकडून वयुसेनेच्या ताफ्यात मिग 21 या विमानांचा वापर अजूनही का केला जात आहे असा प्रश्न उपस्थित केला असता. धनोआ म्हणाले की, मिग २१ बायसन ही लढाऊ विमानं सक्षम असून या विमानांमध्ये उत्तम दर्जाची शस्त्रप्रणाली असल्याचीही माहिती दिली. तसेच येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय वायुसेनेमध्ये राफेल या आधुनिक विमानांचा देखील समावेश होणार आहे अशी महत्वाची माहिती देखील दिली.