बॉलीवूडमधील खलनायकांची खबर घ्यावीच लागेल – गृहमंत्री

bollywood

मुंबई : बॉलीवूडवर सरसकट आरोप करणं चुकीचं आहे. पण काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. नायक आणि खलनायक यांच्यात फरक करून खलनायकांची खबर घ्यावीच लागेल, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख बोलत होते.

“बॉलीवूडमधील काहीजण अंमली पदार्थ्यांच्या आहारी गेल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या अपप्रवृत्तींचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस वाईट प्रवृत्तींचा योग्य समाचार घेतील. मात्र, फक्त काही जणांच्या चुकीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला बदनाम करणं योग्य नाही,” अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.

दरम्यान, दुसरीकडे बॉलिवूडला संपवण्याचा किंवा मुंबईतून बाहेर इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही हे कारस्थान सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता योगी आदित्यनाथ आणि भाजप यांना दिला आहे. मु

ख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यानंतर मनसेने देखील बॉलिवूडच्या मागे खंबीरपणे उभे राहून समर्थन केलं आहे. बॉलिवूड स्थलांतराच्या याच चर्चांवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-