प्रकाश आंबेडकराविषयी आमच्या मनात आदरच – डॉ. गफ्फार कादरी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभेतही एमआयएम आणि वंचित बहुजनची आघाडी गरजेची होती. आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा नेहमीच आदर करतो. त्यांच्यासाठी आजही आमचे दारे खुली आहेत. ते भविष्यात तरी आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

एमआयएमच्या राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. व नवीन कार्यकारिणी निवडण्यात येत आहे. यात एमआयएमच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती डॉ. गफ्फार कादरी यांची निवड झाली.

Loading...

डॉ. कादरी म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत आघाडी झाली नाही त्याची खंत आहे. मात्र आम्ही आता नव्याने आमच्या पक्षाची बांधणी करत आहोत. राज्यात पक्षाला मजबुत करण्याचा प्रयत्न राहिल. वंचित आघाडी सोबत बोलणी फिस्कटल्यानंतर तसेच विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर एमआयएमने मुंबई वगळता राज्यातील सर्व कार्यकारणी रद्द केल्या आहेत. आता पुढील महिनाभरात नवीन संघटन तयार करुन जिल्हा, तालुका स्तरावर कार्यकारणी गठीत केल्या जाणार आहे. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या नवीन-जुन्या असा सर्वच जणांना संधी देण्यात येणार आहे. लकरच राज्यभर दौरे करुन पक्षाच्या जिल्हास्तरावर नवीन कार्यकारणी निवडल्या जाणार आहे.

औरंगाबाद महापालिकेतील उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध जाऊन मतदान करणाऱ्या एमआयएमच्या सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. पक्षापेक्षा कुणीच मोठा नसून शिस्त न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. पक्षापेक्षा कुणीच मोठा नाही. या निवडणुकीत तर एका सदस्याने तर चक्क शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे औरंगाबादेतील नगरसेवकांवरील कारवाई योग्य आहे. त्यांनी माफीनामा दिला किंवा योग्य असे कारण दिले तर त्यांच्याबद्दल पक्ष विचार करेल असे कादरी म्हणाले. चार ते पाच महिन्यांनी होणारी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 115 जागांपैकी आम्ही 70 ते 75 जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गफ्फार कादरी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी